वेड्या माउलीची वेडी माया!!!

डिसेंबर 10, 2010 at 10:34 pm 6 comments

आज दिवसभर सारखा पाऊस पडत होता वादळ-वाऱ्यासहित..एका उंच झाडाच्या शेंड्यावर एक छोटासं घरट असलेल्या त्या पाखराला चिंता लागून राहिली होती,आज माझ्या पिल्लांना दाणा-पाणी कसा करायचा..????पाऊस इतका जोरात होता की .घरट सोडलं तर आपली पिल्लं रस्त्यावर येतील ..अन् एवढ्या वादळ वाऱ्यात ती जगतील की नाही ती हि शंकाच..?म्हणून त्या माउलीची चिंता वाढतच होती..अन् देवाकडे एकच प्रार्थना करत होती तासाभाराकरतातरी पाऊस उघडू डे ..अन् माझ्या पिल्लांना चार घास तोंडात घालू दे …तिचे पिल्लं मात्र तिच्या कुशीत निवांत झोपलेली होती….

अचानक  जोरासा वारा आला अन् सारं झाड इकडचे तिकडे झाले..क्षणभर त्या माउलीचा काळजाचा ठोकाच चुकला …वाटल आपल सारं घरट खाली पडलं की काय असं वाटलं ..पिल्लांसहित..?
दुसऱ्याच क्षणात पिल्लांकडे अन् घरट्याकडे लक्ष गेलं तर सगळ काही ठीक होतं ..तिने अजून घट्ट आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतल…झाडाच्या हलण्याने पिल्लांना जाग आली..
कदाचित पिल्लानाही त्यांच्या आईची तगमग समजली असावी..वरतून आख्खां पाऊस झेलणारी ती माय पिल्लांना एक थेंबही लागू देत नव्हती…
असाच काही वेळ गेला अन् पाऊस उघडला,देवानं त्या वेड्या माउलीची विनवणी ऐकली असावी….त्या माउलीला थोडं बर वाटल होतं..वातावरण एकदम शांत झाल होतं.हवेत गारवा होता ..त्या माउलीला वाटलं आता आपण  घरट्याबाहेर पडायलाच हव…ती निघणार तेच तीच एक पिल्लू कळवळून बोललं.
“आई नको न जाऊ आमच्यापासून असं दूर असं,तुझ्या कुशीत सार काही विसरून जातो आम्ही ….एवढ्या जोर-जोरात वादळ-वारायासहित पडणारा पावसात  तू आम्हला एक थेंबही लागू दिला नाही की साधी इजाही होऊ दिली नाही…साऱ्या-साऱ्या वेदना, दुख,संकट तू आपल्या अंगावर झेलली…तू नसती तर आज आम्ही कुठेच नसतो…..कुठून एवढ बळ मिळवलस, आई तू?”

“कळेल, कळेल तुम्हाला हे सगळ जेव्हा तुम्ही मोठे झाल्यावर…” असं म्हणत तिच्या डोळ्यातून कधी दोन थेंब खाली पडले तिलाही कळले नाही…
स्वत:ला सावरतच ती म्हणली…
“आले मी….लवकरच….” अस म्हणत ती भुरकन घरटयाबाहेर पडली अन् १०-१५ मिनिटात जे काही अळ्या-किडे मिळतील ते ते तिने वेचले अन् ..भराभरा पिल्लांच्या चोचीत टाकू लागली..
पाऊस पुन्हा गर्जत होता…तिला शंका होती..पाऊस परत येण्याची……एक -एक करत तिने साऱ्या पिल्लांच पोट भरल….
अन् पुन्हा घरट्यात आली….पाऊसाची रिप-रिप परत चालू झाली होती…तिला आता मात्र घरट्यातच थांबवा लागणार होतं….मनाला तिच्या एक समाधान होतं .आपल्या पिल्लांच पोट भरल्याचा…तिच्या पोटात मात्र अन्नाचा एक कणही नसताना……..!!
असाच मग दिवस गेला ..पावसातच..अन् आता रात्रही झाली होती…तरी पाऊस काही उघडत नव्हता….ती बिचारी माउली मात्र उपाशीच होती..तशीच रात्र जागून काढत ……तरीही तिला काही वाटत नव्हत…मनात एक प्रकारचे समाधानच होते…आपल्या कुशीत पोरं निवांत झोपलेली पाहून…तिची भूक कुठच्या -कुठे पळाली होती…..!!!!!.

ह्या वेड्या पाखरासाराखीच आपल्या सगळ्यांची माउली असते असं मला वाटत….स्व:त उपाशी राहील पण आपल्या लेकरांना कधी उपाशी नाही ठेवणार… म्हणूनच माझी सगळ्यांना विनंती आहें की काहीही झाले तर आपल्या आई-वडिलांचे उपकार विसरू नका…आणि तिला शेवटी काय अपेक्षा असणार ..आपली लेकर सगळी मोठी व्हावी अन् साऱ्या जगाला गवसणी घालावी..सार जग जिंकाव…..म्हणून म्हणतो  आपल्या आईला कधीही दुखवू नका …एवढीच एक अपेक्षा…..!!

Entry filed under: Uncategorized. Tags: , .

एस.टी.महामंडळ अन् त्यांचे कर्मचारी…..

6 प्रतिक्रिया Add your own

  • 1. देवेंद्र चुरी  |  डिसेंबर 20, 2010 येथे 7:48 pm

    अगदी खर आहे हे…..उत्तम पोस्ट …

    उत्तर
    • 2. Atul  |  डिसेंबर 21, 2010 येथे 10:17 pm

      धन्यवाद देवेंद्र …आपल्या प्रतिसादाबद्दल आभार…!!!

      उत्तर
  • 3. Sachin Joshi  |  डिसेंबर 27, 2010 येथे 2:26 pm

    apratim…. chhan lihilay..

    उत्तर
    • 4. Atul  |  डिसेंबर 27, 2010 येथे 4:24 pm

      धन्यवाद सचिन….आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार…..!!

      उत्तर
  • 5. bhaanasa  |  जानेवारी 12, 2011 येथे 10:01 सकाळी

    प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई….
    भापो…. 🙂

    उत्तर
    • 6. Atul  |  जानेवारी 12, 2011 येथे 3:19 pm

      धन्यवाद सरदेसाई साहेब..आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहें…..!!!

      उत्तर

Leave a reply to Atul उत्तर रद्द करा.

Trackback this post  |  Subscribe to the comments via RSS Feed


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे