Archive for डिसेंबर, 2010

एस.टी.महामंडळ अन् त्यांचे कर्मचारी…..

महाराष्ट्राचं एस टी महामंडळ म्हटलं की आपल्याल्या सगळ्यात पहिल्यांदा आठवत ते  महामंडळाची लाल डब्बा बस……….लगेच आपल्याला तिचा तो अवतार डोळ्यासमोर येतो….पहिले म्हणजे तिचा रंग….बसला रंग द्यायला महामंडळाकडे  पैसे नसतात(कारण शासनाकडून निधी मिळत नसावा कदाचित!!!)….अन् एखादी बस रंगवलेली असलीच तर ती फक्त शासनाच्या एखाद्या सामाजऊपयोगी जाहिरातीन असणार……म्हणजे..निसर्गाबद्दल जाहिरात असली तर सगळी बस निळी..त्यात सफेद रंगात झाडं काढलेली…..अन् त्यावर …”पाणी अडवा पाणी जिरवा” असा काहीतरी संदेश असणार…किंवा आरोग्यखात्याची जाहिरात असली तर..व्यसनाबद्दल असणार (रामरावांनी तंबाखू सोडली ..तुम्ही कधी सोडणार?..रामरावांचा चित्रासहित..)….किंवा कुटुंब नियोजनाबद्दल,भ्रूणहत्याबद्दल असणार वैगरे वैगरे………

अन् अश्या जाहिराती खूप प्रभावीही असतील असं मला वाटतं, कारण प्रवासी लोकं जेव्हा जेव्हा बस स्थानकावर असतात…तेव्हा तेव्हा त्यांना दुसरे कामच नसते…अश्या जाहिराती वाचण्याशिवाय(कमीत कमी जेवढे साक्षर लोकं आहें तेव्हढे लोकांना तरी)…

…..हा तर अश्या जाहिराती असलेल्या बस असो ..किंवा फक्त लाल रंग दिलेल्या बस असो…त्या बस वर साचलेली धूळ म्हणजे रस्त्यांनी बसला दिलेली एक प्रकारची देणगीच….तशी प्रत्येक वाहनाला धूळ हे भेटतेच…फक्त आपल्या महामंडळाला बस पुसायला किंवा पाण्याने धुवायला वेळ नसतो, अन् अजून बसच्या खिडकीच्या काचा पण एकतर पूर्ण काळ्या पडलेल्या असतात…किंवा तुटलेल्या तरी असतात..तर अशा ह्या बसला रस्त्यावरचे खड्डे कायम सोबतीला असतात…….म्हणून आपली एस.टी. बस ..एकदम खटारा बस..होऊन जाते……..त्या बस मध्ये बसले की एखाद्या हेलीकॉप्टर मध्ये बसल्यासारखे वाटते….तिचा तो खड-खड आवाज, बसच्या ब्रेकचे कर कर आवाज.!!!! बस वर लावलेली पाटी पण १८५७ च्या काळातली असल्यासारखी….पाटीवर लिहीलेल गावाचे/शहराचे  नाव वाचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते…ही अवस्था आहे गावातल्या किंवा तालुका स्तरावर असणाऱ्या बसेसची..नाही म्हणायला शहरातल्या बसेस किंवा लांब पल्ल्याच्या, जिल्हा स्तरावर असणाऱ्या बसेस तश्या व्यवस्थित असतात….

बर असो….मी जास्त नाही लिहिणार ह्या गोष्टीवर…लिहिणार आहें ते फक्त महामंडळातील कर्मचारी माणसांचा….

……….हा तर आपण कधी विचार केला आहें का महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा …तिथले चालक(ड्रायव्हर)…वाहक(कंडक्टर)….बाकीचे कर्मचारी आपल्याला कधी माहित होत नाही …..अन् झाले तरी फक्त थोड्या लोकांना….अन् ज्यांना पण माहित होत असतील  त्यांना

पण त्यांच्या पदाचे नाव सांगता येणार नाही…

म्हणजे…

१. चौकशी अधिकारी :- डेपोमध्ये असणारे …सर्व बस गाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती देणारे एक(आपल्याला कधी बसच्या चौकशीची गरज पडली तर…? ते कायम पाहिले वेळापत्रकाकडे बोट दाखवणारे..) डेपोमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे हिशेब ठेवणारे(ह्यांच्याशी आपला कधी संबध येत नाही..)

२. ……पासचे फॉर्म वैगरे भरून घेणारे क्लार्क (ज्या लोकांना पासची गरज असते ..अश्या लोकांचीच ह्यांचाशी गाठ पडते…).. ..

३. पास मंजूर करून देणारे………..आगार व्यवस्थापक…..वैगरे..वैगरे…

अशीच बरीचशी मंडळी असतात आपला प्रवास सुखाचा करण्यसाठी धडपडत असतात……..पण अश्या मंडळीमध्ये आपला ज्यांच्याशी जास्त संबंध येतो ते म्हण्जे…ड्रायव्हर अन् कंडक्टर…..बाकी लोकांचा आपण कधी विचारही करत नाही अन् इथेपण करणार नाही……….मी बऱ्याच वेळा संगमेंर पुणे,पुणे-संगमनेर प्रवास करत असतो…कारण माझ मूळ गाव संगमनेर आणि पुण्याला मी नोकरी करतो….तर माझा प्रवास नेहमी लाल डब्ब्यातूनच…तर अश्याच एके दिवशी सकाळी सकाळी मी संगमनेर बस स्थानकावर आलो…पुण्याची बस पकडण्यासाठी…….नेहमीप्रमाणे नाशिक-संगमनेर-पुणे, नगर-संगमनेर-पुणे,शिर्डी-संगमनेर-पुणे अश्या बाराचाश्या गाड्या संगमनेर वरून जातात…..म्हणून पुण्याला यायला मला बस लगेच भेटतात. ……अश्याच दिवशी, सुट्टीचे दिवस असल्यामुळे सर्व बसेसला गर्दी होती… जेवढ्या बस येत होत्या त्या सर्व गच्च भरून येत होत्या वाटलं २-४ बसेस अश्याच जाऊन दिल्या…पण जसा–जसा दिवस पुढे चालला होता…कोणतीतरी गाडी थोडी रिकामी येईल असं वाटत होत पण तसा काही नव्हते होत. मला उभे राहूनच जावे लागेल…असं वाटत होतं..अशीच ४०-४५ मिनिट गेली…बस तर काही रिकाम्या येत नव्हत्या….शेवटी ठरवलं आता जी बस येईल त्यात चढायचे…आणि उभे राहून जावे लागले तरी जायचे म्हणून….थोड्याच वेळात इगतपुरी-अकोले-संगमनेर-पुणे बस आली ती पण पूर्ण भारालेली होती…तरी गर्दीतून वाट काढत मी बस मध्ये चढलो..आणि पूर्ण बसमध्ये जरा नजर टाकली…कुठे काही जागा भेटते का म्हणून….? पण नाही कुठेच काही नाही….आणि मग मनाची पक्की तयारी केली की चार तास उभा राहून जाऊ म्हणू…मग काय मनाची तयारी झाल्यानंतर मग गर्दीचे पण काही वाटले नाही……असाच जागा शोधत-शोधत ड्रायव्हरच्या केबिनकडे लक्ष गेल तर तिथे कोणीच बसलेले नव्हते म्हटलं चला आज तिथे बसू..आणि मग ड्रायव्हरची परवानगी घेवून त्यांच्या शेजारीच बसलो….इंजिनच्या बॉक्सवर….मनाला एक समाधान वाटले की आज एका एस.टी.चालकाचे  जीवन कसे असते ते तरी समजेल म्हणून…..कसे वाटते एवढे मोठे अवजड वाहन चालवण..अन् एवढ्या प्रवाश्यांना घेवून जाणे..जरी मी बस चालवणार नव्हतो तरी बस चालवण्याच्या मनस्थितीत गेलो होतो…एक ४५-५०च्या वयात असलेला माणूस…केस निम्मे सफेद झालेले ..गांधी टोपी घातलेली…माध्यम अंगकाठी…..दात थोडे लालसर पडलेले…कदाचित तंबाखू खाऊन..( सगळीकडे प्रसिद्ध असलेली गाय-छाप..तंबाखू……..मी तंबाखू त्याना मळताना बघितले होते..त्यांच्या पुडीवरचे नाव.)अशीच बोलता–बोलता त्या ड्रायव्हारची ओळख करून घेतली….तर ते इगतपुरीमध्ये राहायला आहे..त्यांची बस ही इगतपुरी आगाराचीच आहें….

“किती वाजता निघाली बस इगतपुरीमधून काका?” मी असच विचारलं.

“सकाळी ५ वाजता” चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न ठेवता त्यांचे उत्तर….

“मग किती वाजता पोहचेल पुण्यात…अन् तिकडनं परत कधी येणार…?” मी मोठ्या उत्सुकतेने विचारले…

“पोहचते…१-२ ला…तसा वेळ आहें बसचा दुपारी पावणे-एक चा वाजता पुण्यात पोहचण्याचा, पण हे ट्राफिक इतकं असतं की दीड वाजून जातात शिवाजीनगर मध्ये पोहचता–पोहचता……. आणि दीड वाजता परत फिरण्याचा वेळ आहे ह्या बसचा…” ड्रायव्हरकाका..

“अन् मग १:३० निघाल्यावर किती वाजता पोहचणार?”
“९:४५ची वेळ आहें इगतपुरीमध्ये पोहचण्याची.. पण १०:३० -११ रा होतात… “  आता थोडासा वैतागलेला चेहरा करत…..आणि हे रोजचेच असते…

“हे असं आसत बघ…एकवेळ हाय-वे ला बस चालवण सोप्प…पण असं शहरात असं कोणीही मध्ये रस्त्यात आडवे होत्यात…बघ ते शिंगरू अजून मिसरूडही नाही फुटलं तेच मोटर-सायकल चालवताय….” बसला आडवा गेलेल्या त्या मोटार-सायकलवाल्याला उद्देशून..अन् थोडाश्या वैतागलेली भावमुद्रा करून..

मी मनातल्या मनात गणित मांडत होतो किती काम करता म्हणून..हे लोकं…आणि मी ड्रायव्हरशेजारी बसलेलो असल्याने मला पुढे किती ट्राफिक असते ते समजायला वेळ नव्हता लागत…असच एक एक करत आमची बस आता नारायणगाव बस स्थानकावर आली होती…आणि प्रत्येक शहरात ट्राफिक असतेच..मोटोर-सायकल वाले…कुठे मध्ये रस्त्यात आडवे येतात…रिक्षावाले मधेच घुसत असतात.आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखा..तर छोट्या गाड्या (कार,जीप वैगरे)…मधेच एस.टी. ला आडवे जातात.अन् एवढी लांब असणारी बस एवढ्या गर्दीतून काढायची म्हणजे मोठी कसरतच आहें अस मी समजतो…अन् हे रोजच करायचे आहें …आणि रोज काही रस्त्यावर अपघात होताच असतात..मग त्यामुळेही ट्राफिक जाम होताच राहते…. अन् अजूनही प्रवासी लोकं जिथे म्हणतील तिथे बस थांबवावी लागते…म्हणजे जिथे घंटी वाजेल तिथे बस थांबवायची…….

“मग तुम्हाला ह्या ट्राफिक चा वैताग येत नाही का काका? “मी आपल उत्सुकतेपोटी विचारलं…

“येतो…ना. कसा नाही येणार ..पण करणार काय..रोजचेच आहे ..हे ..अन् पोटापाण्यासाठी कष्ट तर करावेच लागणार….अन् तुला सांगु का पोरा ह्या सगळ्याची सवय झाली आहें आता…काही वाटत नाही आता..”

त्यांचं बोलणं ऐकता ऐकता माझ्या मनात दुसरेच विचार चालू होते… साधा आपण एक दिवस एखादा तास पुण्यासारख्या शहरातून प्रवास केला तर किती वैताग येतो..आणि अगदी थकल्यासारख वाटत…..आपण आपला एकदम संयम नसल्यासारख याला-त्याला शिव्या देत असतो…अन् इथे ही लोकं रोज त्यांची काम नित्यनियमाने करतात….अन् त्यांचा संयम किती असतो बघा…मी बऱ्याच वेळा बस मध्ये असताना..बसमधील प्रवाशी लोकं बस-ड्रायव्हरला उगाचच शिव्या द्यायचं काम करता, म्हणजे ..”ह्याला नीट गाडी चालवता येत नाही का? किती हळू-हळू गाडी चालवतोय वैगरे.. वैगरे”…पण आज मला इथे ड्रायव्हरशेजारी बसल्यानंतर कळले की रस्त्यावरचे सारीच लोकं ही शिस्तीत नाही चालत….कोण कधी आडव येईल ह्याचा भरवसा नाहीये….म्हणून तर मला ही कर्मचारी मांडली खूप संयमी असतात असं वाटत….

अन् तसे बघितले तर त्यांना जास्त पगार पण नाही भेटत…फक्त त्यांना इतर भत्ते भेटतात म्हणून बरे आहें त्यांचे ….अन् त्यांना जास्त सुट्टी पण नाही भेटत…कारण जेव्हा-जेव्हा काही सणा-सुदीचे दिवस असतात …तेव्हा –तेव्हा  एस.टी महामंडळ बसेसची संख्या वाढवते..आणि मग साहजिकच ह्या लोकांना सुट्टी नाही भेटत…..हे लोकं आपली वैयक्तिक जीवन कस सांभाळता कोणास ठाऊक….जी स्थिती चालकाची तीच वाहकाची…तरीपण ह्या लोकांचे कष्टाचे मला अप्रूप वाटते…आणि त्यांच्या जीगरीबद्द्ल नवल वाटत….आणि ही लोकं करत असलेल्या कष्टाला सलाम करत….इथे लिहिण्याचे थांबवतो….!!!

डिसेंबर 29, 2010 at 10:45 pm यावर आपले मत नोंदवा

वेड्या माउलीची वेडी माया!!!

आज दिवसभर सारखा पाऊस पडत होता वादळ-वाऱ्यासहित..एका उंच झाडाच्या शेंड्यावर एक छोटासं घरट असलेल्या त्या पाखराला चिंता लागून राहिली होती,आज माझ्या पिल्लांना दाणा-पाणी कसा करायचा..????पाऊस इतका जोरात होता की .घरट सोडलं तर आपली पिल्लं रस्त्यावर येतील ..अन् एवढ्या वादळ वाऱ्यात ती जगतील की नाही ती हि शंकाच..?म्हणून त्या माउलीची चिंता वाढतच होती..अन् देवाकडे एकच प्रार्थना करत होती तासाभाराकरतातरी पाऊस उघडू डे ..अन् माझ्या पिल्लांना चार घास तोंडात घालू दे …तिचे पिल्लं मात्र तिच्या कुशीत निवांत झोपलेली होती….

अचानक  जोरासा वारा आला अन् सारं झाड इकडचे तिकडे झाले..क्षणभर त्या माउलीचा काळजाचा ठोकाच चुकला …वाटल आपल सारं घरट खाली पडलं की काय असं वाटलं ..पिल्लांसहित..?
दुसऱ्याच क्षणात पिल्लांकडे अन् घरट्याकडे लक्ष गेलं तर सगळ काही ठीक होतं ..तिने अजून घट्ट आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतल…झाडाच्या हलण्याने पिल्लांना जाग आली..
कदाचित पिल्लानाही त्यांच्या आईची तगमग समजली असावी..वरतून आख्खां पाऊस झेलणारी ती माय पिल्लांना एक थेंबही लागू देत नव्हती…
असाच काही वेळ गेला अन् पाऊस उघडला,देवानं त्या वेड्या माउलीची विनवणी ऐकली असावी….त्या माउलीला थोडं बर वाटल होतं..वातावरण एकदम शांत झाल होतं.हवेत गारवा होता ..त्या माउलीला वाटलं आता आपण  घरट्याबाहेर पडायलाच हव…ती निघणार तेच तीच एक पिल्लू कळवळून बोललं.
“आई नको न जाऊ आमच्यापासून असं दूर असं,तुझ्या कुशीत सार काही विसरून जातो आम्ही ….एवढ्या जोर-जोरात वादळ-वारायासहित पडणारा पावसात  तू आम्हला एक थेंबही लागू दिला नाही की साधी इजाही होऊ दिली नाही…साऱ्या-साऱ्या वेदना, दुख,संकट तू आपल्या अंगावर झेलली…तू नसती तर आज आम्ही कुठेच नसतो…..कुठून एवढ बळ मिळवलस, आई तू?”

“कळेल, कळेल तुम्हाला हे सगळ जेव्हा तुम्ही मोठे झाल्यावर…” असं म्हणत तिच्या डोळ्यातून कधी दोन थेंब खाली पडले तिलाही कळले नाही…
स्वत:ला सावरतच ती म्हणली…
“आले मी….लवकरच….” अस म्हणत ती भुरकन घरटयाबाहेर पडली अन् १०-१५ मिनिटात जे काही अळ्या-किडे मिळतील ते ते तिने वेचले अन् ..भराभरा पिल्लांच्या चोचीत टाकू लागली..
पाऊस पुन्हा गर्जत होता…तिला शंका होती..पाऊस परत येण्याची……एक -एक करत तिने साऱ्या पिल्लांच पोट भरल….
अन् पुन्हा घरट्यात आली….पाऊसाची रिप-रिप परत चालू झाली होती…तिला आता मात्र घरट्यातच थांबवा लागणार होतं….मनाला तिच्या एक समाधान होतं .आपल्या पिल्लांच पोट भरल्याचा…तिच्या पोटात मात्र अन्नाचा एक कणही नसताना……..!!
असाच मग दिवस गेला ..पावसातच..अन् आता रात्रही झाली होती…तरी पाऊस काही उघडत नव्हता….ती बिचारी माउली मात्र उपाशीच होती..तशीच रात्र जागून काढत ……तरीही तिला काही वाटत नव्हत…मनात एक प्रकारचे समाधानच होते…आपल्या कुशीत पोरं निवांत झोपलेली पाहून…तिची भूक कुठच्या -कुठे पळाली होती…..!!!!!.

ह्या वेड्या पाखरासाराखीच आपल्या सगळ्यांची माउली असते असं मला वाटत….स्व:त उपाशी राहील पण आपल्या लेकरांना कधी उपाशी नाही ठेवणार… म्हणूनच माझी सगळ्यांना विनंती आहें की काहीही झाले तर आपल्या आई-वडिलांचे उपकार विसरू नका…आणि तिला शेवटी काय अपेक्षा असणार ..आपली लेकर सगळी मोठी व्हावी अन् साऱ्या जगाला गवसणी घालावी..सार जग जिंकाव…..म्हणून म्हणतो  आपल्या आईला कधीही दुखवू नका …एवढीच एक अपेक्षा…..!!

डिसेंबर 10, 2010 at 10:34 pm 6 comments


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे