Archive for मार्च, 2014
विचार…एक विचार..एक उमेद
दिवस असाही येतो- जातो..सकाळपासून उदास वाटतंय…रोज रोज तेच आणि तेच..
निवडणुका आल्या..ह्याचा प्रचार ..त्याचा प्रचार, ह्याचे भाषण त्याचे भाषण…हा त्याला शिव्या देतो..आणि तो त्याला शिव्या देतो….कधी एकाच दगडात दोन पक्षी मारणे..काही काही..तीन तीन पक्षी पण मारतात..एकाच दगडात!! असो… सगळे काही ऐकून असेच डोक्यात जातात……डोकं विचार करणे सोडून देते..म्हणते जाऊदे राव..कशाला ती डोकेफोड!!
सगळे काही मनाला पटत नाही अशातच मन निराश होतंय…..खूप काही असते … काय करावे सुचत नाही…
जीवाला निराश वाटत राहते…
उदास मनी हुरहूर असते..
शीण येईल जीवाला,
मन थकेल जीवाला
असतील धडा शिकवणारे…झाडे..
उन्हा-तान्हात उभे राहण्याचे बळ
मनाला समजावणारे….
होऊ नको निराश….
असेल येणारे क्षण आशेचे..स्वप्न पाहण्याचे…
असेल अपेक्षा जीवाला तुझ्याकडून…
अन तुलाही जीवनाकडून…………..
करशील सामना…आल्या संकटाना!!!