माझा परीचय
माझं डोक एक साध-सुधंच डोकं तसं पहिलं तर एकदम रिकामं खोकं……..पण त्यात असणारा मेंदू..तो म्हणजे एक किडाच आहें…तो काही ह्या खोक्याला रिकामं राहू देत नाही…सारखा भणभण करत असतो…..सतत काही ना काही विचार करत असतो……कधी चांगले तर कधी वाईट..हेच विचार डोक्यात राहिले तर डोकं कुजण्याची शक्यताच जास्त असते…..मग त्या डोक्याला ते विचार बाहेर फेकून देऊशी वाटतात नाहीतर डोक्याला भीती असते त्याचं अस्तित्व संपण्याचं..!!
…मग डोक मेंदूवर दबाव आणत ह्या विचारांना बाहेर फेक म्हणून..मग मेंदू त्याचं मेंदू वापरतं, अन् डोळ्यांना कागद अन् लेखणी शोधायला लावत…ज्या क्षणी हे कागद अन् लेखणी सापडतात,त्याक्षणी मेंदू आपला मोर्चा हाताकडे वळवतो…..अन् जे काही विचार आहें ते भरभर कागदावर उतरवण्याच काम हाताची बोट आपल्या लेखणीच्या सह्यःयाने करतात…..
मग तेव्हा कुठे माझं डोकं शांत होत…अन् मग पुन्हा पुढचा विचार करायला ते मोकळे..!!
मी अतुल कडलग एक शेतकरी कुटुंबातील…मुळचा संगमनेर तालुक्यातील एका छोटाशा गावचा..सध्या पोटा-पाण्यासाठी पुण्यात असतो..वर सांगितल्याप्रमाणे माझं डोकं काही मला शांत बसू देत नाही, म्हणून जे जे काही डोक्यात येत असत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहें..
एक छंद/आवड म्हणून मी इथे लिहिणार आहें..आपल्याला आवडलं तर प्रतिक्रिया जरूर दया, कारण तुमचे प्रोत्साहनच माझ्या डोक्याला शांत नाही बसू देणार..अन् त्या डोक्यातून चांगले अन् चांगलेच विचार बाहेर पडतील.!!!
2 प्रतिक्रिया Add your own
प्रतिक्रिया व्यक्त करा
Trackback this post | Subscribe to the comments via RSS Feed
1.
marathiekankika | मार्च 20, 2012 येथे 9:43 pm
Hi,
Tried to comment on Shabda. It does not allow me to use any other address than word press. I have word press account, but I use it for Ekankika. Instead, I wanted to use google/ my blog profile – http://mohanaprabhudesai.blogspot.com/
Hope you have received the comment about Shabda too.
2.
Atul | मार्च 20, 2012 येथे 11:02 pm
Hi..
actually I didn’t received your comment regarding “Shabd”.
You can use your wordpress account for the comment or use Open ID.
Thanks for your response.