खवचट
मार्च 15, 2012 at 6:53 pm यावर आपले मत नोंदवा
(भाग १)
खवचट!!! खवचट ..हा शब्द पण उच्चारताना नेमका ‘च’ वरच जोर द्या..तसं जे खवचट लोकं असतात त्यांना ह्या गोष्टी सांगायची गरज नाहीये…तर आता खवचट ह्या शब्दाबद्दल काय लिहिणार…म्हणून अश्या माणसावर लिहावं..जे ह्या शब्दाचा पुरेपूर उपयोग करून घेतात…आणि बाकीच्या लोकांना पण त्याचा पूरेपर अनुभव देतात.
ज्यांच्यावर ह्या खवचटपणाचा प्रयोग होतो (किंवा बळी पडतात)जे ह्यांच्या खवचटपणाला काहीच प्रत्युतर देत नाहीत.. त्यांच्या तोंडाकडे पाहवत नाही….बिचारे…
पण दुसरा पण प्रकार आहे इथे……अगदी खवचट ला दुसरा खवचटच भेटला तर मात्र मग मज्जा येते…त्यातून एकतर भयंकर भांडण होते..नाहीतर काहीतरी विनोद तरी होतात….आणि ह्या खवचट लोकांत तिसरा भेटला तर अगदी विचारू नका…..
असेच काहीतरी खवचट लोकांचे खवचट उदाहरणे इथे देत आहेत…
प्रसंग १.
काही दिवसापूर्वी बसने प्रवास करत होतो…एका बसस्थानका वर बस थांबली…बसमधले प्रवासी काही उतरले, काही चढले…त्या प्रवासामागून लगेच नेहमीप्रमाणे वेफर्स, फरसाण,पाणी,फळं,उसाचा रस,चिक्की, ई. जे काही असले ते घेवून चार-पाच जण आले…
“चला वेफर्स,बिस्कीट….”
“चला पाणी, पाणी, थंडगार पाणी…”
असं सगळ्यांच ओरडणं चालूच होते..काही प्रवासी त्यांना जे पाहिजे होते ते घेत होते.. .
तो पाणी बाटली वाला माझ्या सीट जवळ आला आणि ओरडू लागला ‘पाणी,पाणी म्हणून..’
तेवढ्यात माझ्या जवळ बसलेले गृहस्थ…३०-३२ वय असलेले जाड भिंगाचे चष्मा घातलेले….त्यांना ह्या पाण्यावाल्याने विचारले की
“देऊ का पाणी बाटली साहेब?”
साहेब काही एक नाही दोन नाही….त्यांनी लगेच आपल्या बॅगमध्ये हात घातला…चांगली १.५ लिटरची पाण्याची बाटली काढली..आणि घटाघटा चार-पाच घोट पाण्याचे घेतले….त्या बाटली वाल्याचा समोरच…आणि पाणी पिवून झाल्यानंतर मोठा आवाज काढला घश्यातून… आणि एक कटाक्ष टाकला त्या पाण्यावाल्याकडे…..
बिचार तो पाण्यावला काय करणार …बिचारा निघून गेला पुढे…….मला आलेले हसू आवारात नव्हते….आणि ह्या माणसाला जसा आपण पानिपतची लढाई जिंकलो असंच वाटत होते…… आता काय बोलणार?
प्रसंग २.
कुठल्यातरी एका सरकारी ऑफिसच्या प्रसाधनगृहात दोन गृहस्थ आपापले विधी उरकून, त्या प्रसाधानगृहात असलेला तुटका आरश्यासमोर तयार होत असतात.
आरसा छोटा असल्यामुळे एका मागे एक उभे असतात.दोघांचेही वय ४०-४५ च्या दरम्यान असते, दोघेही एकमेकांना अनोळखी असतात. दोघांमध्ये एकच फरक असतो की,
एकाच्या डोक्यावर दाट केस असतात त्यांचे नवा खंडेराव!. आणि दुसऱ्याच्या डोक्याचे पूर्ण विमानतळ व्हायचे थोडेसेच बाकी असून, चार-पाच नावाला केस असतात, त्यांचे नाव तात्याराव!
तात्याराव आपले आरश्यात आपला चेहरा न्याहाळत होते..
तर तेवढ्यात ते खंडेराव खिश्यातून एक कंगवा काढतात… ..आरश्यासमोर होतात, आपले
केसाची स्टाईल मारत भांग पाडू लागतात…एक जोरदार कटाक्ष तात्यारावांच्या असलेल्या टकल्याकडे आणि उरलेल्या केसांकडे टाकून!!!
तात्यारावांनी हा खंडेरावाचा हा खवचटपणा ओळखला…….ह्यावर तात्याराव शांत बसतील ते कसले…..ह्यांनी काय करावं…..
ह्यांनी पण आपल्या खिश्यातून एक बारीकसा कंगवा काढला…..आणि एक जबरदस्त खुन्नस खंडेरावांना दिली…..आपल्या चार-पाच केसांमध्ये कंगवा फिरवला…….आणि असे जोरात आवाज करून हसले की खंडेरावचा चेहरा बघण्यासारखा होता……खंडेरावांनी आपला कंगवा हळूच खिशात ठेवला व चालते झाले….. ह्याला म्हणतात…खवचटास महाखवचट!!!!
प्रसंग ३.
भर उन्हात १२ च्या सुमारास दोघेजण मोटारसायकल वर चालले आहेत, गर्दीचा रस्ता, पायी चालणारेही थोडेफार लोक आहेच.ह्या मोटारसायकलवर जाणारे दोघे… ह्यांच्या मोटारसायकलीची पुढील लाईट लागला आहे……
गर्दीतून हे रस्ता काढत होते….पायी चालणारे माणसंही होतीच, त्यातच एक माणूस पायी चाललेला..थोडासा त्रस्त झालेला..आधीच उन्हाचा त्रास….त्यात ह्या मोटारसायकलीची लाईट डोळ्यावर चमकली…..ती मोटारसायकल जेव्हा जवळ आली ….
तेव्हा त्या मोटारसायकलस्वराला लाईट बंद करायला सांगावी म्हणून, हे पायी चालणारे गृहस्थ हाताचा इशारा करून म्हटले…..
“साहेब ….लाईट चालू आहे….”
तर त्या महाशयांचा प्रतिसाद बघा..
“जाऊदे ना भो……….माझ्या बापाला ह्या लाईटच काही बिल येत नाही…………!!! “ असं खवचट बोलून…पुढे निघाले….
आता ह्या खवचटपणाबद्दल काय म्हणावे…..?????
(क्रमश:)
Entry filed under: Uncategorized. Tags: खवचट, विनोदी.
Trackback this post | Subscribe to the comments via RSS Feed