शब्द….!!!!
सप्टेंबर 19, 2011 at 6:05 pm 4 comments
मन उदास असलं की…. काय करावे तेच सुचत नाही…
कसे आणि काय शब्द मांडायचे तेच सुचत नाही..
मन एकटं पडलेलं असतं ……काळ्या ढगांनी आभाळात गर्दी केल्यासारखी ….मनात साचलेलं दु:ख ….
कधी अश्रूंच्या रुपात कोसळेल काही नेम नाही…..!!!
अश्या वेळी कुठून मनात येतं कुणास ठाऊक….
हातात पेन आणि कागद घेऊशी वाटतात……..
सगळे परके …अन फक्त शब्दच जवळ वाटतात…
काय अन कसं लिहावं ..काहीच कळत नाही……
मनातही काही शब्द नसतात.
…..अश्यातच आपोआप पेन उचलला जातो… कुठेतरी कागदही सापडला जातोच सोबतीला….
उगाच काहीतरी लिहियाचे म्हणून इकडचे तिकडचे शब्द खरडायला सुरवात करायची…
का कुणास ठाऊक….हे खरडणच मनाला उमेद देते…
जगण्याची… सारं काही शब्दात मांडलं जात…
मनाची सारी जळमटं निघून जातात ..कुठच्या कुठे…
कसलं सामर्थ्य असावं ह्या शब्दात….?? की आपल्याच भावनाचे खेळ..?
काही असो…
पण हेच शब्द जवळचे वाटतात…. मन हलकं करणारे शब्द…!!!
Entry filed under: Uncategorized. Tags: मन, शब्द.
4 प्रतिक्रिया Add your own
प्रतिक्रिया व्यक्त करा
Trackback this post | Subscribe to the comments via RSS Feed
1.
Mohana | मार्च 21, 2012 येथे 7:13 pm
छान माडलं आहे. भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत हे म्हणायलाही शेवटी शब्दांचाच आधार घ्यावा लागतो हेच खरं .
2.
Atul | मार्च 24, 2012 येथे 4:12 pm
खूप खूप धन्यवाद मोहना..आपल्या प्रतिक्रिया खूप उत्साह देणाऱ्या आहेत!!! 🙂
3.
ShabdMarathi (@shabdmarathi) | मार्च 23, 2012 येथे 8:20 pm
khup chhan
4.
sagar | ऑगस्ट 4, 2012 येथे 12:04 सकाळी
खुपच छानमस्तच लिहल आहे