पूर्वजन्मीचे कर्म आणि त्याचे फळ

फेब्रुवारी 11, 2011 at 1:03 pm 14 comments

एक महान विठ्ठलभक्त असलेला एक सज्जन नावाचा गृहस्थ पंढरपूर नगरीत कोणे एके काळी राहत होता.त्याचा मांस/मटण विकण्याचा धंदा होता अन ह्यातूनचं तो आपला उदरनिर्वाह करत असे.म्हणून लोक त्याला सज्जन कसाई म्हणत असे.तो एवढा विठ्ठल भक्त होता की असं एकाही क्षण नसेल की त्याच्या मुखी पांडुरंगाचे नाव नसेल….त्याच्या ह्या भक्तीने विठ्ठलही त्याला प्रसन्न झाला होता.त्याचा धंदा एवढा चालायचा की कधी-कधी त्याला जेवायलाही फुरसत मिळत नसे…असेच एके दिवशी त्याच्या दुकानावर खूप गर्दी होती सकाळपासून दुकानावर ग्राहकांची रांगच लागलेली होती.सज्जन सकाळपासून आपलं काम करत होता अगदी प्रामाणिकपणाने,मुखात पांडुरंगाचे नाव आहेच. आता दुपारचा एक वाजला होता. तरी दुकानातून सज्जन कसाईला जेवायला सुट्टी मिळेना…इकडे विठ्ठल-रुक्मिणी हे सगळे बघत होते.तेव्हा रुक्मिणीदेवी पांडुरंगाला म्हणते.
“भगवान, तुमच्या एका भक्ताला जेवायला वेळ मिळेना.दुपारचा एक वाजला आहे,बिचारा सकाळपासून उभा आहे..जा त्याला जेवायला सुट्टी द्या..”
“हो बरोबर आहे तुमचे..मलाही पाहवत नाही त्याचे कष्ट…मला आता जावेच लागेल.” असं भगवान विठ्ठल म्हणत लगेच सज्जन कसाईच्या दुकानावर हजार झाले आणि सज्जन कसाईला जेवायला सुट्टी दिली.
तर अशी ही भक्ती होती सज्जन कसाईची..जिथे स्वतः पांडुरंग त्याची काम करत …..म्हणजे त्याची भक्तीही तेव्हढी श्रेष्ठ असेल.तर हा सज्जन कसाई भजन,अभंग ह्यातून पांडुरंगाच गुणगान करायला कधीही कमी पडत नसे,एकादशीला निरंकार उपवास करणे,नियमित वारीला जाणे.अन मुखात अखंड हरिनामाचा जप करायचा….
तर असेच एके दिवशी सज्जन कसाईच्या मनात आले की जगन्नाथ पुरीला जाऊन यावे.मग काय मनात आले म्हणजे ते पुरे करावे लागणार मग हा विचार आपल्या बायकोला सांगितला आणि एका दिवशी सज्जन कसाई जगन्नाथ पुरीला निघाला एकटाच…..
मजल-दरमजल करत रोज हा माणूस जगन्नाथ पुरीची वाट चालू लागला.दिवसभर चालायचे रात्र झाली का एखाद्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करायचा जे खायला मिळेल ते खायचे..सकाळ झाली का परत आपली वाट धरायची …मुखात सदैव  देवाचे नाव.७-८ दिवस गेले त्याची रोजचाच नित्यक्रम .दिवसा पायपीट करायची रात्री आराम करायचा.

एके दिवशी असाच दिवसभर चालून चालून थकलेला सज्जन कसाई…एका घरी मुक्कामी थांबला.त्या घरीच जेवण केले…जेवण झाल्यानंतर त्या घराच्या अंगणातच तो झोपण्यासाठी अंथरून टाकले…आणि दिवसभर थकलेला असल्यामुळे लगेच ततिथे पडून घेतले…उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त गार-गार वारा सुटलेला ..वरती निरभ्र आकाश ..आर्धाकृती चंद्र..बऱ्यापैकी उजेड …टिपूर चांदणे पडलेले…दिवसभर थकलेले शरीर आणि मन अगदी उस्ताही आणि प्रसन्न झाले…..ह्या टिपूर चांदण्याकडे बघताच सज्जन कसाई झोपी गेला….असेच १०-१५ मिनिटे झाली असतील तेच कोणीतरी आपल्याला धक्का दिल्याचे सज्जन कसाईला जाणवले….डोळे उघडून बघितले तर तो चकितच झाला आणि समोर पाहतो तर त्या घराची एक सुंदर तरुण बाई त्याच्यासमोर बसलेली होती…ह्याच माउलीने मला आज जेवण दिले होते हे त्याला ओळखायला वेळ नाही लागला.
“काय ….काय झाले..?” अगदी घाबरलेल्या आवाजात त्याने विचारले.
“घाबरू नका…..”  ती तरुण स्त्री अगदी सौम्य आवाजात त्याला म्हणाली.त्याच्या थोडेसे जवळ येत…
“नाही…म्हणजे काही पाहिजे तुम्हाला …”  तो तिच्यापासून लांब सरकत…
“काही नाही ..तुम्ही एवढे तेजस्वी आहात..मला तुमच्याशी संबंध ठेवायचे आहे..जेव्हापासून तुम्हाला बघितले तेव्हापासून मला चैनच नाहीये…” ती तरुण स्त्री अगदी लडिवाळ  आवाजात बोलत होती….अगदी कोणीही तिच्या जाळ्यात सहज ओढला जाईल अशा प्रकारे…. पण सज्जन कसाई घाबरून गेला आणि तिला समजू लागला..
” नाही माऊली,मी असं नाही करू शकत मी एक विठ्ठल भक्त आहे……..तुम्हाला काही लाज आहे की नाही तुम्ही एक विवाहित आहे अन तुमचे पती तिकडे झोपलेले आहेत ..”
” आहो तुम्ही कोणालाही घाबरू नका ….अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा !!” असं म्हणत ती त्याच्या अजूनच जवळ येऊ लागली…
आता मात्र सज्जन कसाई थोडेसे चिडले..आणि त्याने तिला असं बाजूला केले आणि ते तिथून उठून चालायला लागले…
तेव्हढ्यात ती बाई म्हणाली …
” तुम्ही कोणाला घाबरताय…माझ्या नवऱ्याला ” .असं म्हणत म्हणतचं तिने अंगणात असलेली कुऱ्हाड उचलली आणि घरातल्या खोलीत झोपलेल्या आपल्या नवऱ्याच्या मानेवर टाकली..
क्षणात तिने आपल्या नवऱ्याचे शीर आणि धड अलग केले ….हे पाहून तर सज्जन कसाईचा पारा     एकदम चढला ..डोळे लाल बुंद झाली..
तेव्हड्यात ती  स्त्री त्याच्या दिशेन आली आणि म्हणाली
“आता बघा…मी माझ्या नवऱ्याला पण मारले आहे….आत्ता तुम्हाला कोणालाही घाबरायचे कारण नाही…” कामेच्छेने पेटलेली ती बाई असं म्हणत सज्जन कसाईला येऊन बिलगली ..दुसऱ्याच क्षणी सज्जन कसाईने उलट्या हाताची तिच्या गालफडात लगावली  आणि ती अंगणात जाऊन पडली…
“अरे तू बायको आहे का …वैरीण… आपल्या पतीला मारले तू जो की परमेश्वरासामान असतो….परमेश्वर तुला कादापी माफ करणार नाही..” लाल-बुंद झालेले डोळे जणू आग     ओकत होते…….असे म्हणत ते चालू लागले ….
हा माणूस काही आपलं ऐकत नाही असं समजल्यावर मात्र ती आता चवताळून पेटली आणि म्हणाली
“थांबा……जाताय कुठे….? माझे ऐकत  नाही का ? ” असं म्हणत ती जोर जोराचा आरडा -ओरडा करू लागली..
“वाचवा वाचवा…” असं आरोळी देताच  आजूबाजूचे लोक धावत पळत आली आणि काय झाले झाले असे विचारू लागली,लगेच त्या बाईने सांगितले की  ह्या माणसाने माझ्या नवऱ्याला मारले..म्हणून…सज्जन कसाईचे काही ऐकून घेण्याच्या आतच त्या जमलेल्या लोकांनी त्याला मारायला सुरवात केली आणि अगदी बेदम मारहाण केली…सज्जन कसाई जमिनीवर कोसळून विव्हळत होता..देवाचा धावा करत होता….त्या जमलेल्या लोकांनी त्या बैला विचारले की काय शिक्षा द्यायची ह्याला म्हणून….
“ह्याचे दोन्ही हात कापून टाका….अगदी मुळापासून…ह्याच हातानी माझ्या नवऱ्याचा खून केला आहे.”  असं म्हटल्याबरोबर त्या लोकांनी तिथेच पडलेली कुऱ्हाड घेतली..आणि सज्जन कसाईचे दोन्ही हात काढून टाकले….सज्जन कसाईच्या डोळ्यातून मात्र आता रक्ताच्या धारा चालू होत्या…….हे सगळे झाल्यानंतर जमलेली सगळी मंडळी निघून गेली….रात्रीचे १२-१२:३० वाजले होते..सज्जन कसाई तिथून हळू हळू चालू लागला….मनात असंख्य प्रश्न घेऊन…देवा काय गुन्हा केला होता मी ? का आला नाही माझ्या मदतीला धावून?कुठे माझी भक्ती कमी पडली? काय करू मी आता जागून ? हे सारे प्रश्न त्याला त्याच्या पांडुरंगाला विचारयचे होते…….अंधारातच चालत होता….खांद्यामधून भळाभळा रक्त वाहत होते…..खाली पायाला ठेचा लागत होत्या त्याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते..आकाशाकडे बघत आता तो काही वेळा पूर्वी सुंदर वाटणाऱ्या चंद्र-चांदण्यामध्ये तो आता आपल्या पांडुरंगाला पाहत होता…..रस्ता कुठे चालला आहे ते काही माहित नव्हते….रात्रीच्या त्या भयाण वेळी फक्त रात-किड्यांचा कीर-कीर आवाज येत होता..असं तो बरेच  २-३ मैल चालला असेल …पहाटचे ४-४:३० वाजले होते…एक भल मोठे वडाचे झाड त्याला दिसले..त्याने ठरवले की मी आता इथेचं बसणार आणि मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय आणि माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही म्हणून…असं विचार करत तो तिथेच त्या वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाला…पांडुरंगाच नाव घेत..!!!!!

असाच तास-दीड तास झाला…पांडुरंगाला आपल्या भक्ताची हाक ऐकू आली आणि ते सज्जन कसाईसमोर उभे राहिले ..त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला उभे केले…आपल्या पांडुरंगाला पहिल्या पहिल्या सज्जन कसाई खूप -खूप रडला….रडता-रडताच पांडुरंगाला प्रश्न विचारू लागला..
“का देवा ? का असे झाले? काय गुन्हा केला होता मी…? कुठे माझी भक्ती कमी पडली? त्या स्त्रीची मागणी मी मान्य नाही केली ह्यात काय चुकी होती माझी..?सांग देवा..”
“अरे हो शांत हो सज्जन…!! तुझी ह्यात काही काही चुकी नव्हती….तुझी भक्तीही कुठे कमी नाही पडली….पण हे तुझे पूर्व जन्मीच्या कर्माचे फळ आहेत ..” अगदी शांत आवाजात पांडुरंग त्याला समाजावात होते…
” म्हणजे ? मी समजलो नाही देवा?”  थोडाश्या सावरलेल्या सज्जन कसाईने विचारले.
” पूर्व जन्मीच्या कर्माचे भोग कधी कोणाला चुकले नाही आणि चुकाणारही नाही…तू मागच्या जन्मही एक वाटसरू होता…ह्याच वाटेने जाणारा….
तुझे ज्या स्त्रीने हे हाल केले ती स्त्री ही मागच्या जन्मी एक गाय होती आणि त्या स्त्रीचा नवरा हा एक कसाई होता..तू एक दिवस असाच रस्त्याने चालला होता तेव्ह्या त्या कसाईने तुला ती गाय पकडून दे म्हणून सांगितले….आणि तू ती गाय पकडून कसायाच्या हाती सोपवली…त्या कसाईने त्या गायीचे तुकडे तुकडे केले..आणि साऱ्या गावाला वाटून दिले….ह्या केलेल्या कर्माचे फळ तुला अन त्या स्त्रीच्या नवऱ्याला भोगावे लागले ह्या जन्मात….त्या स्त्रीने तिचा बदला चुकता केला ह्या जन्मी…आणि म्हणूनच मला कितीही वाटले तरी मी तुला मदत नाही करू शकलो.”
” मग देवा …ह्यातून काहीच सुटका नाही का माझी….” सज्जन कसाई एकदम शांत झाला होता आता..
” नाही….तुझे भोग तुला भोगावेच लागेल..पण तू एक करू शकतो तू आतापर्यंत चांगलेच काम केले आहे…उरलेल्या आयुष्यात सुद्धा चांगले काम कर आणि अखंड देवाची भक्ती कर ..तुझा पुढचा जन्म नक्कीच चांगला होईल आणि चांगल्या कामी खर्च होईल..”
” ठीक आहे देवा…मी  नक्की प्रयत्न करीन.” असं सज्जन कसाईने म्हटल्यानंतर पांडुरंग तिथून अंतर्धान पावले…आणि थोड्या वेळाने दिवस उजाडला……सूर्य समोरच असलेल्या डोंगरातून डोकाऊ लागला…….आपल्या सोनेरी किरणासंगे….आणि सज्जन कसाईने पण आपली वाट पकडली होती…जगन्नाथ पुरी कडे जाणारी…..!!!!!!!!!

[ता.क.:- ही कथा मी एका प्रवचनात ऐकली आहे…तीच इथे मांडली आहे माझ्या शब्दात…कथेचा सार मात्र तोच आहे.प्रतिक्रिया द्यायला विसरू नका]

Advertisements

Entry filed under: Uncategorized. Tags: , , , , , .

असेच अनुभवलेले…….थोडसे विचार करायला लावणारे…….!!! ह्या जगण्याच्या शाळेत…!!

14 प्रतिक्रिया Add your own

 • 1. aativas  |  फेब्रुवारी 11, 2011 येथे 4:25 pm

  कर्माच्या असल्या कथा वाचायला चांगल्या वाटतात कारण आपल्याला न कळणा-या अनेक गोष्टी जीवनात असतात .. त्याचा काही ना काही तार्किक अर्थ लावल्याविना आपल्याला चैन पडत नाही. पण व्यक्ती मुळात चांगली/वाईट का वागली असेल पहिल्या (!) जन्मात याचे उत्तर नाहीच या तर्कानेही मिळत!

  गायीचा नवरा? गायीचा मालक म्हणायचे आहे बहुधा तुम्हाला 🙂

  उत्तर
 • 2. mejwani  |  फेब्रुवारी 12, 2011 येथे 1:51 pm

  खूप छान कथा आहे ,पूर्वी कधी एकली नव्हती .

  उत्तर
 • 3. swapnali pawar  |  फेब्रुवारी 13, 2011 येथे 2:05 pm

  ass mhantat ki ya janmachi fal ithech bhogavi lagtat tar mag punhrjanmachi suddha fal ka yach janmaat??? he kalat nahi

  उत्तर
 • 4. rita deshmukh  |  नोव्हेंबर 1, 2011 येथे 3:11 pm

  kuni baghitala pahila janma.

  उत्तर
 • 5. sayali s yashwantrao  |  नोव्हेंबर 24, 2011 येथे 5:06 pm

  Hi,
  Katha chan aahe. katha vhachune pratekani changli karm kara mhanje ase dukh Bhogave lagnar nahi.

  उत्तर
  • 6. Atul  |  नोव्हेंबर 28, 2011 येथे 3:03 pm

   dhanywad, sayali!!

   उत्तर
 • 7. mahesh thosar  |  नोव्हेंबर 28, 2011 येथे 5:02 pm

  magchya janmachya vali keleli pap jar ya janmat bhogaychi aastil tar ya janmat tari ka changli kame karayachi hech samajat nahi? kasab ne bharatavar halla kela shekado niraparadh lokanna Thar kele mag Tyla ya janmant fashi na hota phudchya janmat jar shiksha honar aasel tar kay fayda?

  उत्तर
 • 8. full2dhamaal  |  मार्च 21, 2012 येथे 5:18 pm

  सध्या आपण सगळेच सज्जन कसाई आहोत….

  राजकारणी लोक आपल्याकडून मते मागतात

  आणि

  मग ५ वर्षांसाठी देतात असेच सोडून……

  उत्तर
 • 9. vandu  |  मार्च 24, 2012 येथे 4:19 pm

  so good this is karma-

  उत्तर
 • 10. jyoti  |  ऑगस्ट 17, 2012 येथे 12:08 pm

  he khare ahe! mazya pan ayushyat asech karmache bhog astil. khupch problem ahet ayushat. agdi lahanpanapasun.

  उत्तर
 • 11. rita  |  सप्टेंबर 15, 2012 येथे 11:07 सकाळी

  karmavar maza vishavas ahe .

  उत्तर
 • 12. ravindra  |  जानेवारी 25, 2013 येथे 4:38 pm

  khup chhan vatale vachun

  उत्तर
 • 13. संदेश  |  ऑगस्ट 18, 2013 येथे 9:12 सकाळी

  जर आम्ही गेल्या जन्माची कर्माचे फळ भोगत असु तर आम्हाला कस कळणार आम्ही काय पाप केले आहे ते? ईथे तर साक्षात देव तरी होते सांगायला.

  मी तर देवाला हेच सांगेन की ह्या जन्माच्या कर्माचे फळे तु ह्याच जन्मी दे निदान आम्हाला कळेल तरी आम्ही काय पाप व पुण्य केल.

  उत्तर
 • 14. sunny  |  मार्च 30, 2014 येथे 12:27 pm

  good very nice

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Trackback this post  |  Subscribe to the comments via RSS Feed


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे


%d bloggers like this: